नागपूर शहर: एम.डी. पावडरसह तरुण अटकेत : अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण शिरसागर यांनी 5 जून दुपारी 2:30 ला दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत लकडगंज पोलीस आणि नारकोटिक्स टास्क फोर्सने संयुक्तरीत्या मोठी कारवाई करत असद अशफाक शेख या तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.