घनसावंगी: घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर १२ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
घनसावंगी येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला सर्वेअर अनंत मधुकर पाटील यास १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, एका कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार सर्वेअर अनंत मधुकर पाटील याने १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात एकच