दर्यापूर तालुक्यातील लखापूर फाट्यावर काल रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका इसमाला गंभीर दुखापत झाली आहे.अपघातग्रस्त इसमाचे नाव देवकीसन समाधान खेळकर (रा.हरतोटी,मैसपूर) असे असून,दुचाकीच्या क्रमांकावरून त्याची ओळख पटविण्यात आली. अपघातानंतर जखमी अवस्थेत असलेल्या देवकीसन खेळकर यांना तातडीने उपचारासाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राहुल भुंबर यांना मिळाली.