नागपूर शहर: शांतिनगरमधील अवैध ऑनलाइन लॉटरी अड्ड्यावर छापा; दोन अटकेत : अमित देशमुख पोलीस उपनिरीक्षक
पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी 9 जूनला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील लालगंज, चकना चौक परिसरात सुरू असलेल्या एका अवैध ऑनलाइन लॉटरी जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांनी दिली आहे.