जालना: जरांगे समर्थकांकडून कुटुंबाला धमक्या, शिवसेना उपजिल्हा प्रमुख धनंजय पोहेकर,यांची अंबड चौ.येथे प्रसारमाध्यमांना माहिती
Jalna, Jalna | Sep 20, 2026 आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे,की काल त्यांनी एक पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर बरेच आरोप करत त्यांच्या सहकाऱ्यांची ही काळे धंदे बाहेर काढले आहे असे त्यांनी म्हटले आहे त्यामुळे त्यांच्या परिवाराला मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून धमकवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आज केला आहे.