नागपूर शहर: धक्कादायक: २१ वर्षीय सावत्र मुलाकडून २६ वर्षीय आईवर अत्याचार; पीडिता गर्भवती
नागपूरमधील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय सावत्र मुलाने आपल्या २६ वर्षीय सावत्र आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या कृत्यामुळे पीडित महिला गर्भवती राहिली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.