जालना: कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर..
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचे नवनिर्वाचित
Jalna, Jalna | Sep 28, 2026 कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर.. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आवाहन.. आज दिनांक 28 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, गौतम मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.