फार्मासिस्ट सप्ताह निमित्त शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान काढली जनजागृती रॅली
Washim, Washim | Oct 23, 2026 वाशिम शहरातील विविध फार्मसिस्ट महाविद्यालयाच्या वतीने फार्मासिस्ट सप्ताह निमित्त वाशिम शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी प्रतिजैविकांत बद्दल जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले प्रतिजैविकाचे दुष्परिणाम तसेच आरोग्याची काळजी याविषयी घोषणा देण्यात आल्या. सुरक्षित औषध, निरोगी समाज — हीच फार्मासिस्टची खरी सेवा!", "फार्मासिस्ट — आरोग्यसेवेचा विश्वासू साथीदार!" सारख्या घोषणा देऊन फलकांच्या माध्यमातून संदेश दिला. फार्मसिस्ट हे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत, याची समाजाला जाणीव करून दिली. विनाकारण किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे (विशेषतः प्रतिजैविके )न घेणे याबाबत जनजागृती केली.