नागपूर शहर: जुन्या वादातून शेजाऱ्याला 'कटर'ने भोसकले; लकडगंज पोलिसांत गुन्हा दाखल: अरुण शिरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 22 एप्रिल ला दुपारी 05:30 ने दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लकडापूल भागात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहने उभी करण्यावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. या वादात संशयित आरोपी संतोष रणसुरे याने भूषण कडसकर याच्यावर कटरने जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.