नागपूर शहर: नागपूर मेट्रोमध्ये तरुणांचा व्यायाम: वेळेचा सदुपयोग की नियमांचे उल्लंघन?... बघा व्हायरल व्हिडिओ
नागपूर मेट्रोमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मेट्रोच्या डब्यात काही फिटनेस प्रेमी तरुणांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या मेट्रोमध्ये या तरुणांनी चक्क 'जिम'सारखे वातावरण निर्माण करत व्यायाम आणि दंड-बैठका काढल्या. हा प्रकार पाहून मेट्रोमधील इतर प्रवासी थक्क झाले. काहींनी आश्चर्याने हे दृश्य पाहिले, तर काहींनी आपल्या मोबाइलमध्ये हा क्षण कैद केला. काही प्रवाशांनी या तरुणांच्या जिद्दीचे कौतुक केले