दि. 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास कावलगुडा खुर्द येथे एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने उमरी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन धाड टाकली असता अवधूत शेषेराव कदम व इतर आठजण हे विनापरवाना बेकायदेशीररित्या झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत व खेळत असताना नगदी 5800 रु.तसेच 1,30,000 किमतीच्या 5 मोटर सायकलीसह पकडले होते, ह्या प्रकरणी उमरी पोलिसात पोकॉ आकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ पचलिंग हे करत आहेत.