भडगाव: भडगाव भाजपा शहरध्यक्ष यांच्यासह 50+ कार्यकर्ते आमदारांच्या गोटात, शिवसेना कार्यालयात केला पक्षप्रवेश,
भडगाव शहरातील भाजपा युवा मोर्चाचे माजी शहरध्यक्ष निलेश उर्फ मुकेश महाजन यांच्यासह विजय महाजन, ईश्वर महाजन, दत्तात्रय महाजन, प्रमोद महाजन,भूषण महाजन,सचिन महाजन,भगवान महाजन, हेमंत महाजन सुमारे 50+ कार्यकर्त्यांनी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामावर विश्वास ठेवत त्याच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गोटात आज दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी 7:30 वाजता भडगाव येथील शिवसेना कार्यालयात पक्षप्रवेश करत शिवसेनेची कमान हाती घेतली.