दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 च्या दरम्यान कंधार बसस्थानक येथे यातील फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे कंधार बसस्थानक ते नांदेड बसमध्ये प्रवास करत असतांना त्याच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने किंमती 1,67,000/-रू चे मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले फिर्यादी शिवाजी मारोती पवार, वय 45 वर्षे, रा. हटयाळ ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन कंधार पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरटे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों डीकले, हे करीत आहेत