सेनगाव: ठाकरे गट आक्रमक,वाढीव अतिवृष्टी मधून सेनगांव व हिंगोली तालुका वगळल्याने तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकले सडके सोयाबीन
वाढीव अतिवृष्टी यादी मधून सेनगांव व हिंगोली तालुका वगळल्याने सेनगांव शहरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आज तहसीलदार सेनगांव यांच्या खुर्चीवर सडलेले सोयाबीन फेकून ठाकरे गटाच्या वतीने सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन तहसीलदाराच्या खुर्चीवर फेकून सरकारचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यांपैकी हिंगोली व सेनगांव तालुका वगळण्यात आला.