समुद्रपूर: गिरड येथिल मगन संग्रहालयात पार पडला नाविन्य प्राप्त विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव सोहळा
गिरड येथिल मगन संग्रहालयाच्या सभागृहात गिरड ग्रामीण सहकारी पत संस्था व विद्या अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने परीसरातील १० वी १२ वीत नाविन्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून झेप फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गिरडे, पत्रकार गजूभाऊ गारघाटे, सामाजिक कार्यकर्ते सोनुभाऊ ठाकूर, ममता हलवाई, पूजा अग्निहोत्री प्रणय खडसे उपस्थित होते.