समुद्रपूर: शिवणफळ येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषी विभागाच्या घेण्यात आला ऑरगॅनिक शेती मार्गदर्शन कार्यक्रम
समुद्रपुर तालुक्यातील उंदिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवणफळ येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर ऑरगॅनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कृषी मंडळ अधिकारी आर. पि. धनविजय, उन्नती महिला संघाच्या अध्यक्षा सरस्वती पुरके, मगन संग्रहालयाचे प्रतिनिधी विष्णू ब्राम्हणवाडे, कमलनयन बजाज संस्थेचे सचिन चतुर,पाणी फॉउंडेशनचे श्री. बाभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.