खालापूर: सावरोलीत भटक्या श्वानांचा तिघांवर जीवघेणा हल्ला
सावरोली गावात पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. महामार्गावर सावरोली गाव असल्याने बाहेरून नवीन नवीन कुत्री आल्याने गावात भटक्या कुत्र्यांची संख्याही लक्षणीय अशी झालेली आहे. सोमवारी सावरोली गावातील तीन लहान मुलांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन एकाच्या तोंडावर तर एकाच्या कानावर तर एकाच्या पायावर चावा घरात लचके तोडून रक्तबंबाळ केले आहे यातील एक आपल्या नातेवाईकांकडे पाहुणा आलेल्या मुलाला या पिसाळलेल्या कुत्राने चावा घेतला.