घनसावंगी: जालना जिल्ह्यासह शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; पहिल्याच सरींनी नागरिकांना दिलासा
उन्हाच्या तीव्रतेतून सुटका, शेतकऱ
जालना जिल्ह्यासह शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; पहिल्याच सरींनी नागरिकांना दिलासा उन्हाच्या तीव्रतेतून सुटका, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.. आज दिनांक 22 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जालना जिल्ह्यात अखेर मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्येही पावसा