नागपूर शहर: नागपुरात ५०० रुपयांच्या नकली नोटांच्या बंडलाचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून तपास सुरू
सोशल मीडियावर शनिवारी एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला, ज्यामध्ये एका गरीब व्यक्तीच्या हातात ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल दिसत होते. व्हिडिओमध्ये जेव्हा त्याला विचारले जाते की, 'इतक्या पैशांचे काय करशील?', तेव्हा तो 'या पैशांतून रुग्णालय उघडणार' असल्याचे सांगताना दिसतो.