लातूर-लातूर येथील ख्यातनाम स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्याण बलभीमराव बरमदे यांची आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी वर्ष 2025-26 साठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या निवडीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. सोलापूर येथे पार पडलेल्या आयएमएच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे उपस्थित होते.