शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे आमिष दाखवून मोबाईल अॅपद्वारे 52 लाख 05 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीस मध्यप्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातून अटक केली आहे.फिर्यादी हे यापूर्वीपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते. त्यांना WhatsApp वर Monarch Wealth Circle या ग्रुपची लिंक प्राप्त झाली. त्यानंतर Monarch Direct Dealing Account उघडण्यासाठी वैयक्तिक माहिती मागविण्यात आली. पुढे फिर्यादींना VIP 711 WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून....