नागपूर शहर: सावधान! कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुण भाडेकरूचा मृत्यू
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी रोडवरील गाडगे नगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २६ मे रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास, कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.रवि सुभाष भालापूर असे मृत तरुणाचे नाव असून, तो धीरज भगत यांच्या घरी भाड्याने राहत होता. कुलरमध्ये पाणी भरत असताना अचानक करंट लागल्याने तो बेशुद्ध पडला.