घनसावंगी: पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांचा घेराव; जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून जिल्हाधिक
जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी शनिमदिर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या असता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवून निधीच्या प्रश्नावर जाब विचारला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अजित पवार गटाच्या लोकप्रतिनिधींना व पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे राष्ट्रवाद