शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांच्याशी संबंधित रोख रकमेसह असणारा व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर सादर करत चौकशीची मागणी केली होती.मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत असून गुरुवारी सकाळीशहरातील छ शिवाजी महाराज चौकात शिवसेना पदाधिकारी, युवासैनिक आणि महिला आघाडीने एकत्रितपणे चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार निषेध नोंदविला.