आज १६ डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी,२०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी,२०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महत्त्वपूर्ण....