फुलंब्री: फुलंब्री शहरातील तहसील कार्यालयातून अवैध ट्रक चोरी प्रकरणी महसूल प्रशासनाची पोलीस ठाण्यात तक्रार
फुलंब्री तालुक्यातील तहसील कार्यालयातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक चोरी प्रकरणे फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी सदरील अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार योगिता खटावकर यांनी दिली आहे