भोकरदन: पोलीस कर्मचारी भास्कर जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती,पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलीस ठाण्यात केला सत्कार
आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलिस अंमलदार भास्कर जाधव यांची पोलीस विभागाकडून पदोन्नती करण्यात आली आहे ,यामध्ये त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली असून यावेळी भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन या पदोन्नती बद्दल त्यांचा सत्कार केला आहे,यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.