लातूर : कधीकाळी धगधगणारा, धुळीने भरलेला औसा रोड आज घनदाट झाडांच्या सावलीत विसावलेला दिसतो आहे. वृक्ष मित्रांच्या अविरत, निःस्वार्थ प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या या हिरव्या मार्गाने लातूरकरांच्या मनाला दिलासा दिला असून, या परिवर्तनाचा व्हिडिओ 14 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.