नाशिक: आगामी सण उत्सव व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी आणि भद्रकाली भागातील 11 जणांची हद्दपारी
Nashik, Nashik | Sep 16, 2025 आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ एक हद्दीतील पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशाने अकरा गुन्हेगारांना दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली व पंचवटी भागात काझीगडी,जुने नासिक,आडगाव नाका,शिवनेरी झोपडपट्टी,सम्राट नगर,फुलेनगर व इतर भागातील 11 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.