नाशिक: कहां तुम चले गए : जगजीतस्मृतींना नाशिककरांची भावांजली
Nashik, Nashik | Oct 10, 2025 पद्मभूषण गझलसम्राट जगजीत सिंह यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त एक्स्प्रेशन्स संगीत अकादमी व बाबाज थिएटरतर्फे “कहां तुम चले गए” या गझल मैफलीचे आयोजन डॉ. कुर्तकोटी सभागृहात करण्यात आले. प्रसाद व वीणा गोखले यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणारा हा सलग १९ वा कार्यक्रम असून, जगजीत सिंह यांच्या गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. “तेरे खुशबू में बसे खत”, “होश वालो को खबर क्या”, “कहां तुम चले गए” यांसारख्या गझलांना विशेष दाद मिळाली.नागरिकांनी उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोंदवला.