नागपूर शहर: तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक : अरुण क्षीरसागर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक
लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 17 एप्रिलला सायंकाळी 6:30 वाजता दिलेल्या बातमीनुसार नागपूरमधील वैष्णोदेवी चौक परिसरात एका तरुणाला सहा ते सात जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला नोटीस बजावण्यात आली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.