यावल: यावल नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता हीच सेवा पंधरवळ्याला सुरुवात,महर्षी व्यास मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
Yawal, Jalgaon | Sep 17, 2025 यावल नगर परिषद च्या वतीने बुधवारपासून स्वच्छता हीच सेवा पंधरवळ्याला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात व परिसरात स्वच्छता अभियान राबवून या पंधरवड्यांची सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने शहरातील विविध भागात विशेष स्वच्छता अभियान या पंधरवड्यात राबवले जाणार आहे. संपूर्ण पंधरवड्यात शहरात स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी सांगितले.