फिर्यादी यांच्या शेतातील बांबू लागवडीच्या कुशल कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या सामाजिक वनिकरण कार्यालय सेलू येथील वनपाल अमोल फड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोखर्णी फाटा येथे तक्रारदार यांच्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारतांना ताब्यात घेतले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक महेश मारोती पाटणकर यांच्या फिर्यादीवरून वनपाल अमोल फड यांच्या विरोधात पाथरी पोलीसात आज बुधवार 17 डिसेंबर रोजी 1 26 वाजता गुन्हा दाखल.