हिंगणघाट: रिमडोह येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत संतृप्ती शिबीराचे २४ जुनला आयोजन:तहसीलदार योगेश शिंदे
हिंगणघाट तालुका प्रशासनाकडुन तालुक्यातील रिमडोह या गावात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत संतृप्ती अभियानाचे आयोजन करण्यात येणार असुन अदिवासी जमातीच्या शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तिक लाभ पोहचवणे व योजनेबददल जनजागृती करणे हा शिबिराचा उद्देश आहे. या शिबीराचे आयोजन २४ जुन रोजी करण्यात येणार आहे. या शिबीराचा आदिवासी नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश शिंदे हिंगणघाट यांनी आवाहन केले आहे.