लातूर -लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग पुन्हा एकदा अपघाताचे केंद्र ठरला आहे. दरवेळी प्रमाणेच आज, 7 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास या मार्गात पुन्हा पाणी साचल्याने मोटरसायकल घसरून पडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी काही वेळ वाहतूक ठप्प झाली.या भुयारी मार्गात पावसाचे किंवा गॅलरीतून येणाऱ्या पाण्याचे साचलेले प्रमाण इतके वाढते की रोजच वाहनचालकांना धोक्याचा सामना करावा लागतो..