हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर इरिगेशन वसाहत ते कुपटी गावाला जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिकाने केला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे दाखवत या नागरिकाने हा रस्ता हातानेच उकरून दाखवला आहे. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी या नागरिकाने केली आहे.