भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी पुढील ३ तासांत लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सदर अंदाजानुसार, विजांचा कडकडाट होण्याची आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आय एम डी मुंबई कार्यालयाने केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.