आमदार प्रकाश भारसाकडे यांची जनसंपर्क कार्यालय येथे नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार पार पडला अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी भाजपने विविध प्रभागात उमेदवार उभे केले होते तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार माया धुळे या विजयी झाले आहेत तर भाजपचे 11 नगरसेवक देखील निवडून आल्याने भाजप नगराध्यक्ष व या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला