तुमसर: माजी सभापती पारधींचा नगरपरिषदेवर भ्रष्टाचाराचा बॉम्ब; ४८ कोटींच्या पाणी योजनेसह रोड, नाले, शाळा जागेत गैरव्यवहार! <nis:link nis:type=tag nis:id=Viral nis:value=Viral nis:enabled=true nis:link/>
जिल्हा परिषद भंडाराचे माजी सभापती रमेश पारधी यांनी तुमसर नगरपरिषदेच्या भूतकाळातील कारभारावर थेट हल्ला चढवत अनेक गंभीर भ्रष्टाचारांचे परखड आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, ४८ कोटींच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून, याचा लाभ नागरिकांना न मिळता केवळ कंत्राटदार आणि विशिष्ट अधिकाऱ्यांचा फायदा झाला. यासोबतच, रोड आणि नाल्यांच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले, ज्यामुळे विकासाच्या नावाखाली निधीचा गैरवापर झाला.