नाशिक पंचवटी परिसरात भरधाव व बेदरकारपणे चालविण्यात आलेल्या अॅक्टीव्हा दुचाकीने ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला जोराची धडक दिल्याची घटना हिरावाडी रोडवरील दवे फरसाणजवळील जोड रस्त्यावर घडली. या अपघातात महिलेच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास श्रीमती ललिता सुरेश झिंझुर्डे (वय ६५) रस्त्याने पायी जात असताना गल्लीमधून आलेल्या एमएच १५ जेई ६४९७ अॅक्टीव्ह धडक दिली.