लातूर: खोट्या आरक्षण चिठ्ठ्यांचा पोलिसांकडून पर्दाफाश — तिन्ही आत्महत्यांमागील खरे हस्ताक्षर संशयितांचे असल्याचे निष्पन्न
Latur, Latur | Oct 7, 2025 लातूर-लातूर जिल्ह्यात आरक्षणाच्या नावाखाली झालेल्या आत्महत्यांच्या घटनांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाभरात खळबळ उडवली होती. या प्रकरणांमधील आत्महत्येपूर्वी सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र पोलिसांच्या काटेकोर तपासानंतर या चिठ्ठ्यांमागील खोटेपणा उघडकीस आला असून, आत्महत्यांशी संबंधित तीन चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षरे मृतकांची नसून संशयितांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.