“पोलीस स्मृतीदिवस” (21/10/2026)
चे औचित्य साधून मा.पंकज कुमावत, पोलीस अधीक्षक, परभणी यांचे संकल्पनेतून आज दिनांक 23/10/2026 रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस मुख्यालय येथे STUDENT POLICE CADET चे शालेय विध्यार्थी यांना प्रात्यक्षिक व प्रदर्शन पाहण्यासाठी बोलावण्यात आले होते. सदर ठिकाणी 1) भारतीय बालविद्या मंदिर 2) संबोधी विद्यालय 3) शारदा विद्यालय व 4) प्रभावती विद्यालय असे 4 शाळेतून 400 विध्यार्थी यांना पोलीस मुख्यालय येथे येण्यासाठी वाहनाची व्यवस्था पोलीस विभागाकडून करण्यात आली होती. सदर ठिकाणी विध्यार्थी व शिक्षक यांचेसाठी 1) पोलीस बँड पथक 2) डॉग स्कॉड 3) बॉम्ब शोध पथक ( BDDS ) 4) सेल्फ डिफेन्स ( कराटे ) 5) पोलीस विभागात वापरले जाणारे शस्त्र व दारुगोला 6) पोलीस विभागात दैनंदिन वापरले जाणारे वाहन यांची माहिती तसेच ट्राफिस नियम यांची माहिती देण्यात आली आहे. सदर ठिकाणी विध्यार्थी यांना फळाचे वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेऊन विध्यार्थी यांना त्यांचे शाळेत 10.00 वा. सु. पोलीस वाहनांनी सुरक्षित सोडण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात सर्व विध्यार्थी व शिक्षकांनी पाहून आनंद भेटल्याचे कळवले. सदर कार्यक्रम मा. तानाजी चिखले अप्पर पोलीस अधीक्षक, परभणी व मा. रवींद्र पेरगुलवार, पोलीस उपअधीक्षक ( गृह ) यांचे मार्गदर्शनाखाली 1) श्रीनिवास रोयलावार, पोलीस निरीक्षक (PRO) 2)श्री दीपक बोरसे, पोलीस निरीक्षक (HQ) 3)श्री तोटेवाड, BDDS 4)श्री नर्सिंकार RSI 5) श्री कदम MTO पोह/दिपक जंबुरे यांचे एकत्रित उत्तम नियोजनाने पार पडले आहे.
Parbhani, Maharashtra | Oct 23, 2026