महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेच्या लातूर येथील शुभारंभ प्रसंगी सादर करण्यात आलेल्या ‘रे शून्य मना’ या दोन अंकी नाट्यकृतीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत रसिकांची मनं जिंकली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूर शाखा आणि रसबहार नाट्य मंडळ यांनी सादर केलेल्या या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे