भोकरदन: पिंपळगाव रेणुकाई, पारध, वडोद परिसरात व तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन पिके लागली सुकू
आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई, पारध, वडोद तांगडा, वालसावंगी, धावडा, शेलुद यासह संपूर्ण तालुक्यात खरीप पिके सोयाबीन जी शेतकऱ्यांनी तालुक्यात हजारो हेक्टरवर पेरलेली आहे ती पावसाबावी सुकू लागली आहे, अगोदरच पाऊस उशिरा आला आणि एकदा गेला तर परत आलाच नाही मागील 1 महिन्यापासून शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे ,आणि यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.