वाळवा: वाळवा येथील सामायिक विहिरीच्या पाण्यावरून तरुणावर कोयत्याने हल्ला
Walwa, Sangli | Sep 30, 2026 वाळवा येथील सामायिक विहिरीच्या पाण्यावरून मंगळवारी शेतात वाद झाला. या वादात सैफअली लाडखान याला कोयत्याने मारहाण करून किरकोळ जखमी करण्यात आले. संशयित सिराज बाबु लाडखान यांच्याविरुद्ध आष्टा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.