रावेर: अट्रावल येथील बस स्थानकावर किरकोळ कारणावरून वाद, एकाला मारहाण, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 15, 2025 अट्रावल या गावात बस स्थानक आहे. या बस स्थानकावर किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादातून राजेंद्र विठ्ठल लोहार वय ४३ यांना रिंकू आनंदा तायडे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. लोखंडी पत्राच्या झाऱ्याने मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.