महापालिका निवडणुकीसाठी भाजप महायुतीचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे, अशी मोठी माहिती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शनिवार २० डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे. परभणी शहरातील फर्ण हॉटेल येथे आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी हे स्पष्ट केले. महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा निर्णायक टप्प्यात असून, जागावाटप आणि निवडणूक रणनीतीवर एकमत होत आहे. महापालिकेवर भाजप महायुतीची सत्ता आणण्यासाठी एकत्रितपणे ताकद लावली जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.