नागपूर शहर: पाचपावली पोलिसांची 'हॅमर्स कॅफे'वर धाड; ३० जणांवर गुन्हा दाखल: अनिरुद्ध पुरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी 4 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी शहरातील 'हॅमर्स कॅफे अँड रेस्टॉरंट'वर देर रात्री अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात २७ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांनी दिली आहे.