वसई: विराट फाऊंडेशन, अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ९ फेब्रुवारी रोजी विरार रन २०२५ च आयोजन
Vasai, Palghar | Jan 15, 2025 विराट फाऊंडेशन, अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या वतीन विरार रन २०२५ ०९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर या मिनी मॅरॅथॉन मध्ये १.५ की. मी, ३ की. मी आणि १० की. मी. दौड असणार आहे. वयोगट १० ते १२, १२ ते १४ आणि १४ ते १५ मुलं व मुलींचे गट असतील तर या गटासाठी ३ किलोमीटरची रन ठेवण्यात आलेली आहे. तर त्यावरील वयोगटासाठी १० किलोमीटरची रन ठेवण्यात आली आहे. तसेच १ किलोमीटरची फन रन ठेवण्यात आली असून ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी वॉकॅथन आयोजित करण्यात आली आहे.