हवेली: शेअर्स मार्केट मध्ये नफ्याच्या आमिषाने वाघोली येथील तरुणाची २१ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक
Haveli, Pune | Oct 31, 2025 वाघोली येथील मोझे कॉलेज जवळील ३० वर्षीय तरुण सोबत हा प्रकार घडला आहे. व्हॉट्सअॅप वर आलेल्या लिंकला ओपन केल्यानंतर शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले व यानंतर सदर तरुणाची ही २१ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास वाघोली पोलीस करीत आहेत.